Monday, June 22, 2015

9. थालीपीठाच्या भाजणीचे घावन



साहित्य
थालीपीठाची भाजणी, पाणी, चिरलेला कांदा, तिखट, मीठ, तेल
कृती
थालीपीठाची भाजणी एका पातेल्यात घेऊन त्यात चिरलेला कांदा, तिखट, मीठ घालायचं. मग त्यात पाणी घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्याचे तव्यावर घावन घालायचे. गॅस मध्यम ठेवायचा. 3 मिनिटांनी परतायचं. घावन घालण्यापूर्वी तव्याला तेल लावून घ्यायचं. मग डिशमध्ये घेऊन चटणी किंवा सॉस किंवा दह्या सोबत ते सर्व्ह करायचे.
टिप
1.      थालिपीठाबदली घावन पटकन होतात
2.      नॉनस्टीकचा तवा असेल तर सारखं तेल लावावं लागत नाही. पहिल्या घावना नंतर भिजवलेल्या पीठातच तेल घातलं तरी घावन कमी तेलात आणि चांले होतात.