|
|
|
|
साहित्य
|
थालीपीठाची भाजणी, पाणी,
चिरलेला कांदा, तिखट, मीठ, तेल
|
|
कृती
|
थालीपीठाची भाजणी एका
पातेल्यात घेऊन त्यात चिरलेला कांदा, तिखट, मीठ घालायचं. मग त्यात पाणी घालून ते
चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्याचे तव्यावर घावन घालायचे. गॅस मध्यम ठेवायचा. 3 मिनिटांनी परतायचं. घावन घालण्यापूर्वी तव्याला तेल लावून घ्यायचं.
मग डिशमध्ये घेऊन चटणी किंवा सॉस किंवा दह्या सोबत ते सर्व्ह करायचे.
|
|
टिप
|
1.
थालिपीठाबदली घावन पटकन होतात
2.
नॉनस्टीकचा तवा असेल तर सारखं तेल लावावं लागत नाही. पहिल्या घावना नंतर
भिजवलेल्या पीठातच तेल घातलं तरी घावन कमी तेलात आणि चांगले होतात.
|
Monday, June 22, 2015
9. थालीपीठाच्या भाजणीचे घावन
Wednesday, May 13, 2015
8. नाचणीच्या पीठाचं सत्त्व
|
|
|
|
साहित्य
|
1 टेबल स्पून नाचणीचं
पीठ, एक ग्लास दूध, साखर किंवा गूळ, ड्रायफ्रूट्स.
|
|
कृती
|
नाचणीचं पीठ एका पातेल्यात
घेऊन त्यात अर्धा ग्लास दूध घालायचं त्यात साखर किंवा गूळ घालून ते
चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग ते मिश्रण गॅसवर ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं.
(ते मिश्रण चांगलं घट्ट होतं किंवा त्याचा रंग बदलतो ते पारदर्शक होतं). मग ते
खाली उतरवून थंड झाल्यावर त्यात उरलेलं दूध घालायचं, आणि ग्लासात घेऊन वरून
ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करायचं.
|
|
टिप
|
1.
ही डिश खूपच पौष्टीक आहे. हाय प्रोटीन्स.
2.
उन्हाळ्यात हे खासच चांगलं तब्येतीसाठी.
|
Wednesday, April 22, 2015
7. नाचणीच्या पीठाचं अंबील
|
|
|
|
साहित्य
|
1 टेबल स्पून नाचणीचं
पीठ, एक ग्लास ताक, मिरची किंवा तिखट, मीठ, कोथिंबीर.
|
|
कृती
|
नाचणीचं पीठ एका
पातेल्यात घेऊन त्यात अर्धा ग्लास ताक घालायचं त्यात मीठ, मिरच्या घालून ते
चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग ते मिश्रण गॅसवर ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं.
(ते मिश्रण चांगलं घट्ट होतं किंवा त्याचा रंग बदलतो ते पारदर्शक होतं). मग ते
खाली उतरवून थंड झाल्यावर त्यात उरलेलं ताक घालायचं वरनं कोथिंबीर घालायची. आणि
ग्लासातून सर्व्ह करायचं.
|
|
टिप
|
1.
ही डिश खूपच पौष्टीक आहे. हाय प्रोटीन्स.
2.
उन्हाळ्यात हे खासच चांगलं तब्येतीसाठी.
|
Wednesday, April 15, 2015
6. ज्वारी-बाजरीचा उपमा
|
|
|
|
साहित्य
|
अर्धी वाटी ज्वारीचं पीठ,
अर्धी वाटी बाजरीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ,
साखर, 2-3 वाटया पाणी कोथिंबीर, खोबरं
|
|
कृती
|
गॅसवर कढई ठेवून ज्वारीचं
पीठ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं, मग बाजरीचं पीठ तसंच भाजून घ्यायचं. दुसर्या
गॅसवर पाणी उकळत ठेवायचं. आता ती पीठं एका ताटात काढून त्या कढईत तेल घालायचं, तेल
तापलं की मोहरी, हिंग, हळद मिरच्या घालून फोडणी करायची त्यावर कांदा घालायचा, तो परतून
झाला की त्यात ही दोन्ही पीठं घालायची. चांगलं परतायचं मग त्यात 2-3 वाट्या उकळतं पाणी घालायचं.
त्यात चवीनुसार मीठ, साखर घालायची, वर झाकण ठेवून चांगली वाफ काढायची. ती पीठं
शिजली की उपमा तयार. आता तो डिशमध्ये घेऊन त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि खोबरं
घालून सर्व्ह करायचं.
|
|
टिप
|
1.
ही पीठं जेवढी घेतो त्याच्या दुप्पट उपमा होतो त्यामुळे त्या अंदाजाने घ्यायची.
2.
बाजरीच्या बदली नाचणीचं पीठ सुद्धा
वापरलं तरी चालतं.
|
Wednesday, April 8, 2015
5. रव्याचा ढोकळा
|
|
|
|
साहित्य
|
रवा 2 वाट्या, ताक, मिरच्या,
आलं, लसूण, इनो फ्रूटसॉल्ट 1 सॅशे, मीठ, कोथींबीर, खोबरं, तेल, मोहरी, हिंग
|
|
कृती
|
2 वाट्या रवा एका पातेलीत
घ्यायचा त्यात आलं, लसूण, मिरच्या ह्यांची पेस्ट करून घालायची मग त्यात पुरेसं
ताक घालून ते चांगलं (5 मिनीटं) फेटून मिक्स करून घ्यायचं. मिश्रण पातळ सरसरीत
असावं (इडली पीठा इतपत) मग गॅसवर प्रेशर कुकर ठेवायचा त्यात पाणी घालायचं. पाणी
उकळलं की त्यात दुसरं अल्युमिनीयमचं पातेलं तेलाने ग्रिसिंग करून ठेवायचं. मग
ह्या मिश्रणात इनो फ्रूटसॉल्ट घालून ते मिश्रण पुन्हा फेटायचं. आता त्यात येणारे
बुडबुडे थांबेपर्यंत फेटून झाल्यावर ते मिश्रण त्या अल्युमिनियमच्या पातेल्यात
ओतायचं. प्रेशर कुकरची शिट्टी काढून टाकायची आणि झाकण लावून 20 मिनीटं शिजवून
घ्यायचं. दुसर्या गॅसवर फोडणीचं कढलं ठेवून त्यात तेल मोहरी आणि हिंग घालून
फोडणी करून घ्यायची. मग ते कुकर मधलं पातेलं बाहेर काढून ते थोडं थंड झाल्यावर
त्याचे (ढोकळ्याच्या आकाराचे) काप करायचे, त्यावर फोडणी, खोबरं-कोथिंबीर घालून
सर्व्ह करावं.
|
|
टिप
|
1.
हा ढोकळा झटपट करण्यासाठी उत्तम आहे.
2.
मिश्रण उत्तम फेटलं तर ढोकळे छान होतात..
|
Saturday, April 4, 2015
4. साबुदाण्याची झटपट खिचडी
|
|
|
|
साहित्य
|
2 वाट्या साबुदाणा, अर्धी
वाटी दाण्याचं कूट, मिरच्या, कोथिबीर, खोबरं, जिरं, मीठ, साखर, 1 टेबल स्पून तूप.
|
|
कृती
|
साबुदाणा 5-6 तास भिजवून
घ्यायचा (साबुदाण्याच्या थोडंसं वर येईल इतपतच पाणी घालायचं). मग त्या साबुदाण्यात अर्धी
वाटी दाण्याचं कूट, थोडंसं खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर चवीनुसार घालायचं. मग तूपाची फोडणी करायची त्यात
जिरं, मिरच्या घालायच्या आणि ती फोडणी त्या मिश्रणात वरून घालायची. मग चांगलं
मिक्स करून घ्यायचं. आणि ते मिश्रण प्रशर कुकरमध्ये ठेवून त्या पातेल्यावर झाकण
ठेवून 2-3 शिट्ट्या काढायच्या. मग तयार खिचडी डिशमध्ये घेऊन त्यावर खोबरं-कोथिंबीर भुरभुरवून ती सर्व्ह करायची.
|
|
टिप
|
1.
खिचडी थंड झाल्यावर पुन्हा प्रेशर कुकरमध्ये ठेवून शिट्टी काढायची.
1.
ही खिचडी दह्याबरोबर सर्व्ह करावी.
|
Friday, March 27, 2015
3. कोबी पोहे
|
|
|
|
साहित्य
|
2 वाट्या जाडे पोहे, 1
वाटी बारीक चिरलेला कोबी, मीठ, साखर, हळद, मोहरी, हिंग, तेल, कढीपत्ता, मिरची,
खोबरं, कोथींबीर
|
|
कृती
|
कढईमध्ये तेल घालून गॅसवर
ठेवायचं, तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद असं सगळं फोडणीचं
साहित्य घालायचं. त्यावर चिरलेला कोबी आणि मिरच्यांचे तुकडे घालायचे. मग 1 चमचा
साखर आणि थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून वाफ काढायची. मग त्यात चांगले धुवून
घेतलेले पोहे घालायचे. पुन्हा साखर मीठ चवीनुसार घालायचं आणि सगळं छान मिक्स
करून अजून एक वाफ काढायची. मग डिशमध्ये ते पोहे घेऊन त्यावर कोथिंबीर आणि खोबरं
भुरभुरून पोहे सर्व्ह करायचे.
|
|
टिप
|
1. हे पोहे जैन डिश म्हणून ओळखले जाऊ शकतात.
कांदा लसूण नसल्यामुळे.
|
Tuesday, March 24, 2015
2.तांदळाची उकड
|
|
2. तांदळाची उकड
|
|
साहित्य
|
1 वाटी तांदळाचं पीठ, 2
वाट्या आंबट ताक, 1 वाटी पाणी, मीठ, मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, तेल.
|
|
कृती
|
एका वाडग्यात तांदळाचं
पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, ताक आणि पाणी घालून चांगलं एकत्र करून घ्यायाचं.
मग गॅसवर एक कढई ठेऊन त्यात तेल घालायचं, तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी, हिंग,
कढीपत्ता आणि हळद घालून त्याची फोडणी करून घ्यायची आणि त्यावर हे मिश्रण ओतायचं.
मग झार्याने चांगलं ढवळत रहायचं. उकळी यायला लागली की झाकण ठेऊन एक वाफ
काढायची. उकड तयार.
|
|
टिप
|
1.
हि उकड सर्व्ह करताना त्यावर थोडं कच्च तेल घालूनसुद्धा सर्व्ह करतात.
2.
आवडत असल्यास फोडणीत लसूण घालावी.
3.
अशीच नाचणीच्या पीठाचीसुद्धा उकड करता येते. (लसूण न घालता)
|
Friday, March 20, 2015
1. केळ्याचा हलवा
साहित्य
|
2 (मोठी) राजाळी केळी, 1
वाटी साखर, एका नारळाचा चव, 1 चहाचा चमचा वेलची पावडर.
|
कृती
|
केळ्यांचे मध्यम तुकडे
करावे. त्यात साखर, नारळाचा चव आणि वेलची पावडर घालून अर्धा तास ठेवून द्यावं.
मग ते मिश्रण गॅसवर ठेवून मंद आचेवर साधारण 15-20 मिनीटं शिजवावं. घट्ट झाल्यावर
उतरवून ते ड्रायफ्रूट्सने सजवून सर्व्ह करावं.
|
टिप
|
1.
ह्यात साखरेऐवजी
गूळ वापरला तरी चालतो.
2.
हा पदार्थ थंड (फ्रिजमधला) जास्त चांगला लागतो.
3.
ह्यात व्हॅनीला आईस-क्रीम घालून पण सर्व्ह करता येऊ शकतो.
|
Subscribe to:
Posts (Atom)

