Wednesday, April 15, 2015

6. ज्वारी-बाजरीचा उपमा




साहित्य
अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ, साखर, 2-3 वाटया पाणी कोथिंबीर, खोबरं
कृती
गॅसवर कढई ठेवून ज्वारीचं पीठ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं, मग बाजरीचं पीठ तसंच भाजून घ्यायचं. दुसर्‍या गॅसवर पाणी उकळत ठेवायचं. आता ती पीठं एका ताटात काढून त्या कढईत तेल घालायचं, तेल तापलं की मोहरी, हिंग, हळद मिरच्या घालून फोडणी करायची त्यावर कांदा घालायचा, तो परतून झाला की त्यात ही दोन्ही पीठं घालायची. चांगलं परतायचं मग त्यात 2-3 वाट्या उकळतं पाणी घालायचं. त्यात चवीनुसार मीठ, साखर घालायची, वर झाकण ठेवून चांगली वाफ काढायची. ती पीठं शिजली की उपमा तयार. आता तो डिशमध्ये घेऊन त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि खोबरं घालून सर्व्ह करायचं.
टिप
1.      ही पीठं जेवढी घेतो त्याच्या दुप्पट उपमा होतो त्यामुळे त्या अंदाजाने घ्यायची.
2.      बाजरीच्या बदली नाचणीचं पीठ सुद्धा वापरलं तरी चालतं.

No comments:

Post a Comment