Tuesday, March 24, 2015

2.तांदळाची उकड


2. तांदळाची उकड
साहित्य
1 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाट्या आंबट ताक, 1 वाटी पाणी, मीठ, मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, तेल.
कृती
एका वाडग्यात तांदळाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, ताक आणि पाणी घालून चांगलं एकत्र करून घ्यायाचं. मग गॅसवर एक कढई ठेऊन त्यात तेल घालायचं, तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हळद घालून त्याची फोडणी करून घ्यायची आणि त्यावर हे मिश्रण ओतायचं. मग झार्‍याने चांगलं ढवळत रहायचं. उकळी यायला लागली की झाकण ठेऊन एक वाफ काढायची. उकड तयार.
टिप
1.      हि उकड सर्व्ह करताना त्यावर थोडं कच्च तेल घालूनसुद्धा सर्व्ह करतात.
2.      आवडत असल्यास फोडणीत लसूण घालावी.
3.      अशीच नाचणीच्या पीठाचीसुद्धा उकड करता येते. (लसूण न घालता)

No comments:

Post a Comment