|
|
|
|
साहित्य |
पाकासाठी - 2 वाटी साखर, 2 वाट्या पाणी थोडी वेलची पावडर. गुलबजामसाठी – 1 केळं, 1 वाटी बारिक रवा, 1 चहाचा चमचा तूप, (दूध लागलं तर)
चिमूटभर बेकिंग सोडा, आणि सजावटीसाठी बदाम पिस्त्याचे तुकडे. |
|
पाकाची कृती |
एका पातेलीत पाणी आणि साखर एकत्र करून गॅसवर
ठेवायचं, मग ढवळत रहायचं, साखर विरघळली की 2 मिनिटं उकळायचं आणि मग गॅस बंद करायचा.
मग त्यात वेलची पावडर घालायची. |
|
गुलाबजामची
कृती |
एका परातीत केळं कुस्करून घ्यायचं, त्यात रवा
घालायचा, चमचाभर तूप घालायचं, चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा. आता सगळं छान मिक्स
करून घ्यायचं. वाटल्यास थोडा दूधाचा हापका मारायचा. चांगलं मऊसर मळून घ्यायचं. मग
ते मिश्रण 1 तासभर झाकून ठेवून द्यायचं. मग त्याचे छोटे छोटे गोळे करून मंद
आचेवर तळायचे. तळलेले गुलाबजाम ताबडतोब गरम पाकात टाकायचे. थोडावेळ मुरू
द्यायचे. वरून बदाम पिस्त्याचे तुकडे टाकून सजवायचे. मस्त केळ्याचे गुलाबजाम
तयार. |
|
टिप |
·
पक्का पाक
करायचा नाही. ·
गुलाबजाम
टाकल्यावर पाकाला एक उकळी काढली तरी चालेल त्यामुळे पाक चांगला मुरतो. |

Khup chhan sir... nakki karto
ReplyDelete