Tuesday, June 2, 2026

11. थालीपीठाची भाजणी

 

 


साहित्य

एक किलो तांदूळ, पाव किलो (तपकिरी) हरभरे, पाव किलो मूग, पाव किलो अख्खे काळे उडिद, अर्धा किलो ज्वारी, 30 ग्रॅम (1 वाटी) धणे, 15 ग्रॅम (4 चहाचे चमचे) जीरे

कृती

सगळे तांदूळ 2-3 वेळा पाणी बदलून धुवावेत आणि चांगले 2-3 दिवस पातळ कपड्यावर पसरून वाळवून घ्यायचे. मग ते तांबूस रंगावर भाजायचे.

मग हरभरे, मूग, उडिद, ज्वारी सगळंच चांगलं खमंग भाजून घ्यायचं. (ही धान्य धुवून घ्यायची नाहीत). मग धने, जीरे भाजून घ्यायचे.

आता ते भाजलेलं सगळं धान्य एका सुती कपड्यावर किंवा पेपरवर पसरून ठेवायचं.

ते व्यवस्थित थंड झालं की (दुसर्‍या दिवशी) दळायचं. थोडंसं सरसरीत, भाकरीच्या पीठासारखं दळायचं.

टिप

·       भाजलेलं धान्य ताटात ठेवायचं नाही. त्याला वाफ धरते.

No comments:

Post a Comment