Saturday, June 6, 2026

14. दडपे पोहे (पोहे भाजून)

 

 


साहित्य

1 वाटी पातळ पोहे, 1 मध्यम कांदा (चिरलेला), हिरव्या मिरच्या, तेल, हिंग, हळद, मोहरी, मीठ,1 चहाचा चमचा साखर, 1 चहाचा चमचा लिंबाचा रस, खोबरं कोथींबीर,

कृती

पोहे खमंग कुरकरीत भाजून घ्यावे. थोडे गार झाले की त्यात कांदा, खोबरं, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस, मीठ असं सगळं घालायचं, मग फोडणीच्या कढल्यात फोडणी करावी. तेल तापल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्यांचे तुडके घालावे. ती त्या सगळ्या मिश्रणामध्ये घालून सर्व गोष्टी नीट मिक्स करून वरून खोबरं कोथींबीर घालून सर्व्ह करा.

टिप

- हे मिक्स करताना हाताने करावं म्हणजे छान मिळून येतं.

No comments:

Post a Comment