Tuesday, June 2, 2026

12. चकलीची भाजणी

 

 

12

साहित्य

चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या चणाडाळ, एक वाटी मूग डाळ, एक वाटी उडिद डाळ, 1 चहाचे चमचे धणे, 2 चहाचे चमचे जीरे

कृती

सगळं धान्य म्हणजे तांदूळ, चणाडाळ, मूग डाळ आणि उडिद डाळ हे सगळं  2-3 वेळा पाणी बदलून धुवायचं आणि चांगले 2 तास कपड्यावर पसरून वाळवून घ्यायचं. मग ओलं ओलंच ते तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. मग त्यात धणे, जीरे भाजून घालायचे.

आता ते भाजलेलं सगळं धान्य एका सुती कपड्यावर किंवा पेपरवर पसरून ठेवायचं.

ते व्यवस्थित थंड झालं की (दुसर्‍या दिवशी) दळायचं. थोडंसं बारीक दळायचं.

टिप

·       भाजलेलं धान्य ताटात ठेवायचं नाही. त्याला वाफ धरते.

No comments:

Post a Comment