|
|
|
|
साहित्य |
1 वाटी
थालिपीठाची भाजणी, 1 वाटी चिरलेला बारीक कांदा, तिखट, मीठ, तेल (जरा जास्त
लागतं), मोहरी, हळद, हिंग, कोथींबीर, खोबरं, (साजूक तूप) |
|
कृती |
एका बाऊल
मध्ये भाजणी घेऊन त्यात, तिखट, मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून पीठ पण्यात
भिजवावी... (पोळीसाठी कणीक भजवतो तेवढी घट्ट भिजवावी). गॅसवर कढई मध्ये तेल
घालावं, तेल तापलं की फोडणी करावी. त्यात मोहरी, हळद, हिंग घालावं, मग कांदा
घालून गुलाबी होई पर्यंत परतायचं. आणि मग त्यात ही भिजवलेली भाजणी घालायची मग ती
चांगली ढवळून वर झाकण ठेवायचं. मधून मधून जरा परतायची आणि छान मोकळी झाल्यावर
वरून खोबरं कोथींबीर घालून सर्व्ह करायची... |
|
टिप |
|
No comments:
Post a Comment